जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अहुजा नगर परिसर येथे बहिणीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
महेंद्र देवीदास पाटील (वय 22 रा. आनोरे ता. अमळनेर ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
नुकत्याच राज्यसेवेच्या जागांची जाहीरात प्रसिध्द झाली आहे. या जागा कमी असल्याने महेंद्र नैराश्यात होता, त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत महेंद्र याचे मेव्हण्यांनी दिली आहे. तर मृत्यूपूर्वी महेंद्र याने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नुकत्याच झालेल्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
अमळनेर तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र पाटील हा जानेवारी महिन्यात जळगाव शहरातील आहुजा नगरात बहिण भारती व मेव्हणे हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. २२ मे रोजी महेंद्र याची बहिण व मेव्हणे आनोरे गावात लग्नाला गेले होते. महेंद्र यास त्याची बहिणी भारती यांनी मंगळवार फोन केला. मात्र बिझी असल्याने संपर्क होवू शकला नव्हता. त्यामुळे भारती ह्या बुधवारी सुध्दा सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होते, मात्र फोन लागत नव्हता. त्यामुळे भारती यांनी जळगावातील त्यांचे शेजारी यांना खात्री करण्यास सांगितले. शेजारी घरी गेले असता, दरवाजा आतून लावलेला होता, दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी पोलिसांशी संपर्क केला.
घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील, सतीश हाळनोर, अनिल मोरे, संजय भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी शेवटच्या बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले असतात महेंद्र हा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानुसार दरवाज्याचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. व जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाहून एकच आक्रोश केला.
आई वडील देवा सारखे आहे जीवन गोल आहे त्यांनी माझ्यासाठी खूप काही केल. माझं गोल वेगळा आहे पण माझ्या सोबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एमपीएसीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले, त्यामूळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे असा मजकूर लिहून शेवटी महेंद्र याने आई वडिलांचे आभार मानले आहेत. अशी चिठ्ठी मृत्यूपूर्वी महेंद्र लिहली होती. ती पोलिसांनी ज्या गळफास घेतला तेथून जप्त केली आहे.
महेंद्र याने जळगाव शहरातील एका खाजगी क्लासमध्ये स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला होता. पीएसआय बनण्याचे त्याचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी त्याने गृप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात त्याला कमी मार्क पडले होते. तर दुसरीकडे नुकत्याच राज्यसेवेच्या शासनाने जागा जाही केल्या आहेत. त्या कमी असल्याने महेंद्र नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती, महेंद्रचे मेव्हणे हरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु आहे.