यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील हंबर्डी गावातील एका २५ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेबाबत फैजपूर येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शरीफा न्यामत तडवी वय २५ वर्ष राहणार हंबर्डी ही तरूणी काल २ जुन रविवार रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान आपल्या राहत्या घरातून निघुन गेली होती. दरम्यान रात्री ती उशीरापर्यंत घरी परत न आल्याने कुटूंबीयांच्या वतीने तिचा रात्री शोध घेण्यात आला तरी ते मिळुन आली नाही.
सदरच्या तरुणीचे मृतदेह हंबर्डी शिवारातील कृष्णा टोके यांच्या गट क्रमांक १२ या शेताच्या विहिरीत मृत अवस्थेत मिळुन आले. सदर तरूणी ही आपल्या आई सोबत गावात राहात होती. तरूणीने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलेले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. याबाबत तरूणीचा भाऊ रौनक न्यामत यांनी फैजपुर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. आत्महत्या केलेल्या शरीफा तडवी या तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांनी केले .