सत्यसाई नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका रोड येथील सत्यसाई नगर परिसरातून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची  घटना सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, मोहम्मद अझर जफर शेख (वय-३३ रा. खडका रोड सत्यसाई नगर, भुसावळ) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापाऱ्याचा व्यवसाय करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १० डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता त्यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ सीएस ६३९७) ही घराच्या समोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आला. दरम्यान त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे हे करीत आहे

Protected Content