मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मित्रांसोबत शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय लोणवाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र नारायण पाटील (वय २५ रा. लोणवाडी ता.जळगाव ) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील महेंद्र पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरुवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेंद्र हा त्याच्या मित्रांसोबत लोणवाडी गावातील शेतामध्ये विहिरीत पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने सुमारे ७० फुट खोल असलेल्या विहिरीत बुडून मृत्यू झाला. यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ प्रदीप पाटील व पोहेकॉस्वप्नील पाटील हे घटनास्थळी धाव घेत तरूणांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढून त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content