जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात एका मंदिराच्या आडोशाला बसून गांजाचा नशा करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील वाल्मिकी नगर परिसरातील रहिवाशी कृष्णा सुभाष ठाकूर असे कारवाई झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा ठाकूर हा निर्णय नका परिसरात खंडेराव मंदिराच्या आडोशाला गांजाचा नशा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता कारवाई केली. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याला भादवी कलम 41 (1 ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करित आहेत.