क्षुल्लक कारणावरून तरूणावर धारदार शस्त्राने वार

रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरूणाला धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पिंप्राळा हुडको येथे घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात अमोल चंद्रकांत आराक वय ३४ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात ललीत उर्फ लल्या संतोष वाघ रा. पिंप्राळा याने अमोल आराकच्या आईला शिवीगाळ केली होती. हा जाब विचारण्यासाठी बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अमोल आराक याने आईला शिवीगाळ का केली असा जाब विचारला. याचा राग आल्याने ललीत वाघ याने शिवीगाळ करून धारदार शास्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर दुपारी ४ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी ललीत वाघ याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण हे करीत आहे.

Protected Content