जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला दगडाने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाला दोन जणांनी हातातील दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना सुप्रिम कॉलनीतील फिरदोष डेअरी जवळ घडली. याप्रकरणी सोमवारी २२ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमन सय्यद रशिद (वय-२१) रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीतील फिरदोस डेअरीजवळ उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मुक्या शहा आणि समिर शहा दोन्ही रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी यांनी शिवीगाळ करून दगडाने बेदम मारहाण करून जखमी केली. याप्रकरणी सोमवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री संशयित आरोपी मुक्या शहा आणि समिर शहा दोन्ही रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.

 

Protected Content