दुचाकीचा कट लागल्यावरून तरूणाला बेदम मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चालत्या दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरूणाला ९ ते १० जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे अमोल पाटील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अमोल पाटील हा त्याच्या घरासमोर उभा होता. त्यावेळी त्याला रणजितसिंग रतनसिंग राजपूत यांच्या दुचाकीचा धक्का लागला. त्यावर त्याने जाब विचारला. याचा राग आल्याने रणजितसिंग राजपूत याच्यासह इतर ९ जणांनी अमोल पाटील याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली तर त्याला दुचाकीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी केदारसिंग कोमलसिंग राजपूत, रणजितसिंग रतनसिंग राजपूत, वैभव हरीष राजपूत, विनय कल्याणसिंग राजपूत, कल्याणसिंग ठाणसिंग राजपूत, बबलु धुउकू राजपूत, धुकडू खूशाल राजपूत, भुरा भागवत राजपूत, लखन पांडूरंग राजपूत, पांडूरंग धनसिंग राजपूत सर्व रा. हिंगणे बुद्रुक ता. अमळनेर यांच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल आगोणे करीत आहे.

Protected Content