दोघा भावंडांकडून तरूणाला बेदम मारहाण

शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाल्मीक नगर येथे तरुणाला दोघा भावंडांनी शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार ४ जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात दोघा भावंडांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील वाल्मीक नगर येथे पारस धर्मेंद्र सोनवणे व 23 हा तरुण कुटुंबासह वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारी पारस हा त्याचा भाऊ अजय सोनवणे यांच्यासोबत वाल्मीक नगरातील वाल्मीक ऋषी मंदिराजवळ उभा होता. यादरम्यान या ठिकानी मनोज सुभाष तायडे व नितेश सुभाष तायडे हे दोघे दुचाकीवरून आले. मनोज याने पारस याला शिवीगाळ करत एक वर्षांपूर्वी चोरीच्या गाडी विकण्याचे पैसे खाल्ले व पोलिसांना आमचे नाव सांगितले असे बोलून पारस याला काठीने मारहाण केली. याचवेळी नितेश याने पारस याचा भाऊ अजय याला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तुला मारून टाकू अशी धमकी सुद्धा दोघा भावंडांनी दिली. अशी तक्रार पारस सोनवणे याने शनिपेठ पोलिसात दिली असून या तक्रारीवरून मनोज सुभाष तायडे व नितेश सुभाष तायडे दोन्ही रा. तानाजी मालुसरे नगर या दोघा भावंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र पाटील हे करीत आहेत.

Protected Content