किरकोळ कारणावरून तरूणाला दोघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील वाणी गल्लीत एका १७ वर्षीय मुलाला किरकोळ कारणावरून दोन जणांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, निखील वसंत बिऱ्हाडे हा मुलगा आपल्या परिवारासह आसोदा येथे वास्तव्याला आहे. शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गावातील वाणी गल्लीत ऋतीक बिऱ्हाडे, ध्रुव जयवंत भोळे आणि विक्की चौधरी यांच्या बोलचाल सुरू होते. त्यावेळी निखील बिऱ्हाडे हा तिथे आला. याचा राग आल्याने विक्की चौधरी आणि ध्रुव जयवंत भोळे या दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर निखील बिऱ्हाडे याने शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे विक्की चौधरी आणि ध्रुव जयवंत भोळे दोन्ही रा. आसोदा ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुधाकर शिंदे हे करीत आहे.

Protected Content