भोलाणेत फटाके फोडण्यावरून तरूणाला दोघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फटाके हे मंदीराकडे फेकू नका असे सांगून दोघांच्या हातातील फटाके फेकून दिल्याच्या रागातून एका तरूणाला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर हात पिरगळून करंगडी फ्रॅक्चर करून दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील भोलाणे गावात घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील भोलाणे गावातील वाल्मीक ऋषीच्या मंदीरात निलेश अनिल न्हावी आणि शुभम अनिल न्हावी हे दोघेजण शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता फटाके फोडत होते. यावेळी गावात राहणारा कैलास ज्ञानेश्वर कोळी वय ३६ रा. भोलाणे ता. जळगाव या तरूणाने मंदीरात फटाके फोडण्यास मनाई केली. तरीही निलेश न्हावी आणि शुभम न्हावी हे दोघे मंदीराकडे फेकून फटाके फोडत होते. त्यामुळे कैलास कोळी याने दोघाच्या हातातील फटाके फेकून दिले. या रागातून दोघांनी कैलास कोळी यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि हात पिरघळून करंगळी फ्रॅक्चर केले. याप्रकरणी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ हिम्मत राजपूत हे करीत आहे.

Protected Content