किरकोळ कारणावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कंपनीचा प्लास्टीकचा कचरा मोजण्याच्या कारणावरुन एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घटना सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ममता बेकरीजवळ घडली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शहरातील ममता बेकरीजवळील शहा प्लास्टिकजवळ फिरोज बशिर खान (वय ३६, रा. ममता बेकरीजवळ) हा तरूण वास्तव्याला आहे. सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीतील प्लास्टीकचा कचरा मोजण्याच्या कारणावरुन आकाश सरदार याच्यासह इतर दोघांनी फिरोज खान यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याला मारुन टाकण्याची देखील धमकी दिली. फिरोज खान यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ३ वाजता तीन जणांविरोधात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास पोना हेमंत जाधव हे करीत आहे.

Protected Content