धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात बदनामी केल्याच्या संशयावरून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोपान पुंडलीक नन्नवरे वय ३४ रा. बांभोरी ता.धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोपान याने गावात काहीही कारण नतसांना बदनामी केल्याचा संशयावरून सचिन बाविस्कर, अतुल बाविस्कर आणि सागर बाविस्कर तिघे रा. बांभोरी ता.धरणगाव यांनी बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता तिघांनी सोपान याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. या मारहाणीत सोपान हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून मारहाण करणारे सचिन बाविस्कर, अतुल बाविस्कर आणि सागर बाविस्कर तिघे रा. बांभोरी ता.धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे., पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल लोहार हे करीत आहे.