जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील फातेमानगर भागात किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी फायटरने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना ९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार १४ जून रोजी दुपारी १ वाजता मारहाण करणारे ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील फातिमा नगर परिसरात सय्यद मुल्तजिम सय्यद शफीयोद्दीन वय-३३ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता किरकोळ कारणावरून सय्यद मुल्तजिम याला आसिफ खान अब्दुल रहीम खान, तौसीफ खान अब्दुल रहीम खान, मुस्कान सय्यद मुल्तजिम आणि अब्दुल रहीम खान रशीद खान रा. शेगाव जि. बुलढाणा यांनी सय्यद मुल्तजिम यांच्या घरी येऊन त्याला लोखंडी फायटरने बेदम मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर सय्यद मुल्तजिम याने शुक्रवार १४ जून रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाटील करीत आहे.