अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण गंभीर

accident jal

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीत दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघालेला तरूण अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.अज्ञात वाहन धाराकाच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल रामलाल तिवारी (वय-26) रा. गोपाल दालमिल परीसर, एमआयडीसी, हा एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास दुचाकीने कामावर जात असतांना समोर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात राहुल हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालया उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखपत झाल्याने नातेवाईकांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content