भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरात जुन्या वादातून एका तरूणाला फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश राजेश मोहिते वय २२ रा. गोरखेडा ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता आकाश मोहिते हा भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून जात असतांना जुन्या वादातून संशयित आरोपी इमरान गवळी वय २९, अन्सार रशिद गवळी आणि छट्टु शेखलाल गावळी सर्व रा. कन्हाळा ता. भुसावळ यांनी त्याचा रस्ता आडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर इमरान गवळी याने हातातील फायटरने आकाशच्या तोंडावर मारल्याने गंभीर दुखापत केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकीही दिली.
त्याला तातडीने भुसावळ शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे इमरान गवळी वय २९, अन्सार रशिद गवळी आणि छट्टु शेखलाल गावळी सर्व रा. कन्हाळा ता. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.