भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील समर्थ कॉलनी येथे दारू पिण्यासाठी न गेल्याचा रागातून तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रितमसिंग जितेंद्र पाटील (वय-२३) रा. समर्थ कॉलनी, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रितमसिंग हा घरी असतांना धिरज केसरसिंग जाधव रा. मोहित नगर, आणि याकुब खान रा. हिरा हॉलजवळ भुसावळ हे आले. त्यावेळी दोघांनी प्रितमसिंग याला दारू पिण्यासाठी बोलविले. त्यावर प्रितमसिंगने येणास नकार दिला. याचा राग असल्याने दोघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर घरावर आणि वाहनावर दगडफेक करून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर प्रितमसिंग पाटील याने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून धिरज केसरसिंग जाधव रा. मोहित नगर, आणि याकुब खान रा. हिरा हॉलजवळ भुसावळ या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यासिन पिंजारी करीत आहे.