जुन्या भांडणातून तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निशाणे शिवारातील शेतात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देविदास तुळशीराम भील वय-३५, रा. निशाणे ता. धरणगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान जुन्या वादातून बारकू भीमा मालचे रा. निशाणे ता. धरणगाव याने रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता निशाणे शिवारातील शेतातच्या बांधावर लाकडी दांडक्याने देविदास भिल याच्या डोक्यात टाकून मारहाण केली. व जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता धरणगाव पोलिसात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारा बारकू भीमा मालचे रा. निशाणे ता. धरणगाव यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे करीत आहे.

Protected Content