जळगाव प्रतिनिधी । मेहरुण तलावार फिरायला गेलेल्या २२ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडाल्याची घटना बुधवारी घडली. मात्र बुडालेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आला नसल्याने शोध कार्य सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, साईनाथ शिवाजी गोपाळ (22, रा.समता नगर, जळगाव) हा आपल्या मित्रांसोबत मेहरूण तलावार फिरण्यासाठी गेला होता.दरम्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास हातपाय धुतांना पाय घसरुन पडल्याने तलावात बुडाल्याची घटना घडली. आज गुरुवारी दुपारपर्यंत मृतदेह सापडलेला नसून महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक तसेच पोलीसांकडून मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.
मित्रासोबत साईनाथ काल मेहरुण तलावावर फिरायला गेला होता. याठिकाणी तो पडल्यानंतर सोबतच्या मित्रांनी घरी कळविल्यावर प्रकार समोर आला. काल रात्री शोध घेण्यात आला. तसेच गुरुवारी सकाळपासून शोध घेण्यात येत आहे. मयत साईनाथ याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. कुटुंबिय मजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.