अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटनुसार तात्काळ कारवाई करा : गजानन मालपुरे यांची मागणी(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । वास्तूविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आई यांनी ५ मे २०१८ रोजी आत्महत्या केली असून अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी व इतरांची नावे लिहिलेली आहेत.महाराष्ट्र पोलीस यांनी तात्काळ एका विशिष्ट कालावधीत हा तपास करण्याचे आदेश मुख्यसचिव यांनी पारित करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी महागराध्यक्ष गजानन मालपुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक व त्यांची आई यांनी आत्महत्या केलेली होती. पण आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी सुसाईड नोट लिहिलेली आहे व त्यात पत्रकार अर्णब गोस्वामी व इतरांची नावे लिहिलेली आहेत. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या धर्मपत्नी यांनी फिर्याद देऊन देखिल मुंबई पोलिसांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही, ही महाराष्ट्र पोलीस दलाला काळीमा फासणारी बाब आहे. तरी आमचे म्हणण्यानुसार एखाद्या सुसाईड नोटमध्ये ज्या व्यक्तींचे नावे येतात त्यांना तात्काळ अटक करण्यात येते पण ही केस हाय प्रोफाईल असल्याने आजतागायत ज्येष्ठ पत्रकार व त्यांचे साथीदार व त्या नोट मधील संबंधितांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. अर्णब गोस्वामी सारखे तत्वनिष्ठ पत्रकार यांनी तर पोलिसांच्या मदतीसाठी तात्काळ हजर व्हायला हवे होते. पण, त्यांनी ती नैतिकता दाखवली नाही म्हणून महाराष्ट्र पोलीस यांनी तात्काळ एका विशिष्ट कालावधीत हा तपास करण्यास मुख्यसचिव यांनी आदेश पारित करावे.  या प्रकरणाचा तपास करुन अक्षता नाईक व व त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, चेतन प्रभुदेसाई, सुनील ठाकूर, लोकेश पाटील, ज्योती शिवदे, मनीषा पाटील, विजय राठोड, नितीन जावळे, दिनेश पाथरीया, राहुल शिंदे, विलास बारी, भैय्या वाघ, विजय चौधरी, सागर कुटुंबकें, हर्षल मावळे, क्रांती कानडे, गजानन सोनार आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1235027120194441/

 

Protected Content