जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतात खत देऊन झाल्यानंतर आंघोळीसाठी उतरलेल्या टाकळी येथील धीरज नारायण पवार या अठरा वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी तीन वाजे दरम्यान पिंपळगाव गोलाईत शिवारात ही घटना घडली.
बारावी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विलंब होता. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून धीरज हा श्रीधर झावरु यांच्या शेतात खत टाकायसाठी गेला. खत टाकून झाल्यानंतर आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढत असताना हातातील लोखंडी कडी षटकून पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने धीरज याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.
श्रीधर झावरू यांच्या शेतातील विहीर खोल असून त्यात जवळपास ३० फुटापेक्षा जास्त खोल पाणी आहे. धीरज हा पाण्यात बुडाल्याचे लक्षात येतात विहिरी शेजारी उभे असलेल्या सहकार्याने आरडाओरड केली. इतर लोक धावून येईपर्यंत धीरज पाण्याखाली गेला होता. तीन तासांच्या परिश्रमानंतर धीरज याचा मृतदेह करण्यात जामन्यारातील भोई बांधवांना यश आले. याप्रकरणी तलाठी मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळावर जाऊन स्पॉट पंचनामा केला असून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धीरज याचा मृत्यूने गावावर शोक कडा पसरली असून अंत्यविधी उद्या सकाळी नऊ वाजेला टाकळी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.