धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकरी गावातील ४० वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जनार्दन रामचंद्र सोनवणे वय-४०, रा. साकरी ता.भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्याती साकरी गावात जनार्दन सोनवणे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता साकरी गावाजवळील रेल्वे रुळावरून रेल्वे रोड क्रॉस करत असताना जनार्दन सोनवणे याला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश पालवे करीत आहे.

Protected Content