जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आयोध्या नगरातील लक्ष्मीनारायण नगरात रस्ते व गटारी करून मिळाव्यात या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी बुधवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जळगाव महापालिकेत उप आयुक्त पल्लवी भागवत यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील लक्ष्मीनारायण नगरात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी आणि रस्ते नसल्याने येथील स्थानिक नागरिकांना पावसात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील रहिवासी गेल्या १४ ते १५ वर्षापासून राहत असल्याने महानगरपालिकेला नियमितपणे कर व घरपट्टी भरत आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत रस्ते व गटात न झाल्यामुळे या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने रस्ते व गटारी करून मिळावी या मागणीसाठी बुधवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त पल्लवी भागवत यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर स्थानिक रहिवासी विनायक जाधव, शरद पाटील, चुडामन घुले, दामू जाधव, निलेश जाधव, तुषार जाधव, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह आदित्य स्वाक्षऱ्या आहेत.