Home क्राईम भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी !

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात भरधाव बसने दुचाकीला मागुन जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी २८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बसवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अभिमन्यू लक्ष्मण शिनकर (वय ३८, रा. अरिहंत कॉलनी) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते सेवानिवृत्त भारतीय सैनिक आहेत. १२ जानेवारी रोजी त्यांच्याजवळील (यूके ०७, डीएफ ५४५१) क्रमांकाच्या दुचाकीने स्वातंत्र्य चौकातून जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १४, बीटी १९७९) क्रमांकाच्या बसने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यामध्ये अभिमन्यू शिनकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार झाल्यानंतर चंद्रकांत शिनकर यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी २८ जानेवारी रेाजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक कमलेश पवार करीत आहे.


Protected Content

Play sound