दीड वर्षापासून वृद्धिमान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर

saha

 

मुंबई प्रतिनिधी । फलंदाज आणि विकेटकीपर वृद्धिमान साहा दीड वर्षापासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. साहाला अनुभव आणि यष्टीरक्षण कौशल्यामुळे टीम इंडियात पुन्हा जागा मिळू शकते. अशी संकेत व्यवस्थापनाकडून मिळाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, लवकरच त्याला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता असल्याचं बोल जात आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंतऐवजी साहाला संधी देण्याचा विचार सुरू आहे. तसे संकेत व्यवस्थापनाकडून मिळत आहेत. भारतीय मैदानांवरील खेळपट्ट्यांवर चेंडू उसळल्यानंतर टर्न घेतो. अशी परिस्थिती साहा चांगल्या पद्धतीनं हाताळतो. कसोटी मालिकेसाठी संघात रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनला स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. तर साहा हा उत्तम पर्याय आहे, असे मानले जात आहे. गेल्या १८ महिन्यांपासून साहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकला नाही. साहाच्या अनुपस्थितीत संघाने अनेक विकेटकीपरना संधी दिली. साहाने भारताकडून ३२ कसोटी सामने खेळले आहेत. २०१८ मध्ये दुखापतीच्या कारणांमुळे त्याला खेळता आले नाही.

Protected Content