स्वातंत्र्य चौकातून महिलेची दुचाकी लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकातील डॉमिनोज पिझ्झाच्या दुकानासमोरून महिलेची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत रविवारी १० जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रोशनी निखील अग्रवाल (वय-३५) रा. वर्धमान हाईस, कोल्हे नगर, जळगाव या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्या ओरीयंट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. शुक्रवार ८ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ सीएस ४२४७) ने स्वातंत्र्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा दुकानात आल्या. त्यांनी दुचाकीचे हॅण्डल लॉकन करता चावीसह दुचाकीलावून दुकानात नास्ता करण्यास गेल्या. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीला चावी पाहून चोरून नेली. रात्री ८.३० वाजता त्या दुचाकीजवळ आल्या असता त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळाली नाही. रविवारी १० जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content