जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण तलाव येथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहित महिला जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास निघाली असता नागरिकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर समपर्क साधून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी कार्यतत्परतेने धाव घेऊन महिलेस आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याची घटना शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. दरम्यान या कामगिरीमुळे एमआयडीसी पोलिसांचे नागरीकांकडून कौतूक होत आहे.
याबाबत माहिती अशी कि, सोनाली काळू मते (वय-३४) रा. गणेश नगर, जिल्हापेठ, ह्या जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास जात असताना शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास काही लोकांनी पाहिले. त्यांनी तात्काळ याची खबर ११२ क्रमांकावर डायल करून पोलिसांना दिली. याची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ नितीन पाटील, चंद्रकांत पाटील व महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांनी सदर सोनाली यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना तिची आई व मावशी – सत्यभामा संतोष पाटील, (वय-६५) रा. नवीन जोशी कॉलनी, जळगाव यांच्या ताब्यात सुरक्षित देण्यात आले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.