Home क्राईम महिलेलाअश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

महिलेलाअश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

0
104


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जुन्या भांडणाच्या कारणावरून आसोदा रोड परिसरातील विवाहिता वडीलांच्या गच्चीवर असतांना दोघांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच विवहितेला गच्चीवरुन फेकुन देण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास मोहनटाकी परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असोदा रोड परिसरातील मोहन टॉकीज परिसरात पुजा सचिन सोनवणे या विवाहिता वास्तव्यास आहे. त्यांचा भाऊ लोकेश इंगळे व पुष्पक सोनवणे यांच्यात झालेल्या भांडण झाले होते. त्याच कारणावरुन विवाहिता या वडीलांच्या घरी गच्चीवर होत्या. यावेळी रेखा सोनवणे व विजय हेमलाल सोनवणे यांनी त्यांच्या घरालगत असलेल्या गल्लीत विवाहितेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच अनधिकाराने विवाहितेच्या वडीलांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला आणि विवाहितेला गच्चीवरुन फेकुन देण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound