जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत अंगलट करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार १२ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १२ जून रोजी रात्री ११ वाजता त्याच गावात राहणारा संशयित आरोपी मिलीन हिरालाल धाडी हा महिलेच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर महिलेशी अंगलट करून अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धााव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मिलीन विक्रम चव्हाण रा. लोणवाडी ता. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.