किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण महिलेचा विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एकलहरे गावात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेला शिवीगाळ व लोखंडी रॉडने मारहाण करून विनयभंग केल्याची घटना १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एकलहरे गावात ४० वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता महिलाही तिच्या पतीसह घरी असताना किरकोळ कारणावरून त्यांच्या दुर्गेश भानुदास पाटील आणि दत्तात्रय भानुदास पाटील यांनी घरातील लोखंडी रॉडने महिलेसह पतीला बेदम मारहाण केली. तसेच एकाने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला, हे घटना घडल्यानंतर महिलेने बुधवारी १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तालुक्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे दुर्गेश भानुदास पाटील आणि दत्तात्रय भानुदास पाटील या दोघांवर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पुढे शरीफ खान पठाण हे करीत आहे.

Protected Content