जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अपघातात जखमी झालेल्या पुतण्यासाठी पाहण्यासाठी जात असतांना दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाले तर त्यांचे पती गंभीररित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. पुष्पा गुणवंत पाटील (वय-६६, रा. प्रेमनगर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुणवंत पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह प्रेमनगरमध्ये राहतात. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे पती-पत्नी कोल्हे नगरमध्ये जात होते. महामार्गावर आयटीआय जवळ आलेले असतान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात हे दाम्पत्य खाली पडले. त्या वेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.