अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लुटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अमळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, शहरातील फरशी रोड येथील रहिवासी विशाल विजय सोनवणे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता. फायटरने मारहाण करत कपाळाला पिस्तुल लाऊन खिशातील हजार रूपयांची लूट केल्याच्या आरोपातील हा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.
दरम्यान, पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांना विशाल सोनवणे याच्याबात गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी पथक तयार करून त्याला निर्जन स्थळावून अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक विकास शिरोडे, हवालदार सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, हिरालाल पाटील, सागर साळुंखे, राहूल चव्हाण, सुनील पाटील यांच्या पथकाने केली.
दरम्यान, विशाल विजय सोनवणे याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.