अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। तालुक्यातील जळोद गावात बेकायदेशीररित्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखू असा १७ लाख ३२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल अमळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. यात वाहनासह मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी शुक्रवार २९ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील हातेड रोडवर असलेल्या जळोद गावाजवळील रस्त्यावरून वाहनातून बेकायदेशीररित्या सुगंधित पान मसाला, तंबाखू आणि गुटखा याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत जळोद गावाजवळ वाहन क्रमांक (एमएच ०१ डी आर ११०८) याच्यावर कारवाई केली. त्यावेळी पोलिसांना सुमारे १७ लाख ३२ हजार ४८० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखू मिळून आला. अमळनेर पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हितेश बेहेरे यांनी रात्री ११ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी छोटू रमेश भिल वय-३० आणि सुनील आसाराम भिल वय-३० दोन्ही रा.हेंकळवाडी ता.धुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहे.