जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बेंडाळे चौक ते पांडे डेअरी चौक दरम्यानचा रस्ता दुरूस्ती करावा, या मागणी बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मनसेच्या वतीने प्रतिकात्मक रूग्ण रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात रस्ता दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समोरील रस्ता म्हणजेच बेंडाळे चौक ते पांडे डेअरी चौक दरम्यानचा हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले आहे. वारंवार महानगरपालिका प्रशासनाला निवेदन, आंदोलन करून देखील कोणत्याही प्रकारची रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हा रस्ता रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या खड्ड्यांमुळे रुग्णांना यातना सहन कराव्या लागतात. बऱ्याच वर्षांपासून हा रस्ता खराब झाल्यामुळे महापालिका प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून ठेकेदारालाही पाठीशी घालत आहे. या अनुषंगाने बुधवार १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रतिकारात्मक रुग्ण बनून रस्त्यावर चालून आंदोलन करण्यात आले. या रस्त्याचे काम येत्या ८ दिवसात सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील खरेखूरे रुग्ण रस्त्यावर आणून आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलन प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपशहराध्यक्ष अशीष सपकाळे, सचिव जितेंद्र करोसिया, सचिव दिलीप सुरवाडे, रज्जाक सय्यद, संदीप पाटील, अविनाश पाटील, संदीप मांडोळे, ललित शर्मा, सोनू जाधव, राजीव डोंगरे, दीपक राठोड, विशाल सोनट, अक्षय चौधरी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.