जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये पार्किंग केलेली एकाची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी ३१ जानेवारी रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरणसिंग मानसिंग पाटील रा. हिवरखेडा ता. जामनेर हे कामाच्या निमित्ताने १९ जानेवारी रेाजी दुचाकी (एमएच १९ बीडी ८६२०) ने जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात आले होते. त्यांनी दुपारी २ वाजता बसस्थानकाच्या आवारातील पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करून ते कामासाठी बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांची पार्क केलेली १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. सायंकाळी ७ वाजता चरणसिंग पाटील हे दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी काही दिवस दुचाकी शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर सोमवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.