जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेस्कोमाता नगरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, बादलसिंग भिमसिंग जोहरी (वय-४०) रा. मेस्कोमाता नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बेनटेक्स ज्वेलरी व्रिकी करून आपला उदरनिर्वाह करतात. हा व्यवसाय करण्यासाठी (एमएच १९ डीजी ८६६) क्रमांकाच्या दुचाकीचा वापर करतात. १० फेब्रुवारी रोजी दिवसभर व्यवसाय करून रात्री घरी आले. त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्कींग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी १५ फेब्रुवारी रेाजी सकाळी ५ वाजता उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोध घेतला असता दुचाकी आढळून आली नाही. सायंकाळी ५ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.