तंबाखू व गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराजवळील एकवीरा हॉटेल समोरील रोडवरून अवैधरित्या गुटखा व तंबाखूची वाहतूक करताना आयशर ट्रक जळगाव तालुका पोलिसांनी शुक्रवार १९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत पकडला आहे. पोलीसांनी एकुण १४ लाख ५६ हजार ७७७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता चालकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहराजवळील एकवीरा हॉटेल समोरील रोडवरून अवैधरित्या आयशर ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ४४७४) मधून गुटखा आणि तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत आयशर ट्रक जप्त केला. त्यामधून ९ लाख ५६ हजार ७७७ रुपये किमतीचा गुटखा आणि ५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण १४ लाख ५६ हजार ७७७ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ट्रकवरील चालक भूषण उमेश पवार रा. तूरखेडा ता. एरंडोल याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.

Protected Content