रेल्वे उड्डाणपुलावर ट्रक रिव्हर्स आला अन् नको ते घडलं !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पुलावर शनिवारी मोठा अपघात टळला. शहराकडे येणाऱ्या अवजड ट्रकवरील वाहकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उतारावरून वेगाने मागे गेला. यामुळे मागे असलेल्या तीन रिक्षा आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

या घटनेत नुकसान झालेली वाहने पुढीलप्रमाणे आहेत:

रिक्षा: MH-19-V-9202, MH-15-AK-5312, MH-19-V-8971
दुचाकी: बजाज पल्सर (MH-19-EM-4268), टीव्हीएस ज्युपिटर (MH-19-DU-7865), बजाज पल्सर (MH-19-EB-8278), हिरो स्प्लेंडर (MH-19-EK-9814)

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही रिक्षा पूर्णतः निकामी झाल्या असून चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शनिवारचा बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी होती. अचानक वेगाने मागे जाणारा ट्रक पाहून नागरिक भयभीत झाले. या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रिक्षा चालकांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली असून, संबंधित ट्रक चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

खाली पहा याबाबतचा व्हिडिओ :

 

Protected Content