तांदूळाने भरलेला ट्रक कारवर पडला; कारमधील चार जण जखमी

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्हयात पातूर तालुक्यातील एका नदीच्या पुलावर भीषण अपघात घडला आहे. जिल्हयात कार आणि तांदूळ वाहून नेत असलेल्या ट्रकच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. ही घटना जिल्हयातील पातूर तालुक्यात चान्नी फाटयावरील एका नदीच्या पुलावर घडली आहे.

नदीवरील पुल छोटा असल्याने ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक कारवर पलटी झाली. या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्याने कारमधील चार प्रवासी वाहनात अडकले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली त्यांना किरकोळ जखमा आल्या आहेत. कार व ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

Protected Content