उद्या काव्यरत्नावली चौकात २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

 

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील काव्यरत्नावली चौकात युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना उद्या मंगळवार दि.२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एनसीसी कॅडरचे कर्नल सुनील बाबर, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, कर्नल पी. आर. सिंग, कॅप्टन मोहन कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी २६ रोजी संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे वाचन देखील यावेळी मान्यवर करणार आहेत. तरी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवाशक्तीचे सचीव अमित जगताप, मनजीत जंगीड आदींनी केले आहे.

Protected Content