
नाशिक (वृत्तसंस्था) शहरात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जुने नाशिक, द्वारका, शालीमार, इंदिरानगरसह विविध परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहराची ग्राम दैवत असलेल्या कालिक यात्रोत्सवालाही या पावसाचा फटका बसला. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांसह यात्रेत दुकाने थाटलेल्या दुकानदारांची तारांबळ उडाली.