जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ‘जगद्गुरु महर्षी वेदव्यास’ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल आषाढा शुक्ल पौर्णीमेला कथाकथन, गुरुवंदना व्दारे कृतज्ञता दिवस ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा केला.
प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मुलांना एकलव्य, अरुणी, नचिकेता, अर्जून, कर्ण, भगवान् श्रीराम व योगीराज श्रीकृष्णा प्रमाणेच तुम्ही सुद्धा गुरुभक्ती चा वसा घ्यावा, असा उपदेश केला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते के.सी.ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकरांनी मानव जीवनात गुरुची महती या विषयी व्याख्यानातून गुरुचे महत्व प्रतिपादन करुन विद्यार्थ्यांना आदर्श गुरुभक्तीचा मंत्र दिला.
सदर कार्यक्रमात एकूण १० विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेतील गुरुभक्ती व श्रध्दा यावर आधारित कथाकथन करुन गुरुजनां प्रति कृतज्ञता व आदरभाव व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिक वेदप्रकाश आर्य यांनी केले. शेवटी उपशिक्षिका पी.आर.कोल्हे यांनी ऋणनिर्देशन (आभार प्रदर्शन) करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय एन. बी. पालवे, कलाशिक्षक सतीश भोळे, व्ही. बी. मोरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकाचे विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन दामोदर चौधरी व सृष्टी कुलकर्णी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले.