शरद पवार यांच्या सभेत वादळ सुटले आणि मागे बॅनर पडला

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा पाचवा टप्पा सुरु आहे. यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. धुळयात सुध्दा पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सभा घेतली.
ही सभा नाशिक जिल्हयातील सटाणा येथे झाली. सभेच्या वेळी वादळ सुटले. त्यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू होते. या वादळामुळे व्यासपीठाच्या मागे असलेले बॅनर खाली पडले. बॅनर मागे पडल्यामुळे अनर्थ टाळला. यामुळे परिस्थिती पाहून शरद पवार यांनी आपले भाषण थोडक्यात आवरते घेतले.

Protected Content