अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी यासंदर्भात अमळनेर तालुक्याला नुकसान भरपाईचे अनुदान मिळवण्यासाठी मागणी विधानसभेत मांडण्साठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले आहे.
या निवेदनात असे दिलेले आहे की, अमळनेर तालुक्यातील ८ महसूल मंडळांमध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये सतत पाऊस झाला. ८ सप्टेंबर २०२१ ला अमळनेर तालुक्यातील शिरुड तालुका मंडळात ७१.५ मि.मी. पाऊस झाला अमळगाव मंडळात ६५.३,भरवस मंडळात ६५.८ मि मी पाऊस झाला. तसेच सप्टेंबर महिन्यात अमळनेर मंडळ मध्ये सतत पाऊस झाला.३३५%,शिरुड मंडळ३३३.६%,पातोंडा मंडळ २२७.३%,मारवड मंडळ२३१.९% नगाव मंडळ १८१%, अमळगाव २४८%,भरवस २५७.२% वावडे २९०% पाऊस झाला.
सदर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले परंतु नुकसान भरपाई मिळाली नाही. तरी अमळनेर तालुक्यातील शेतकरयांना न्याय मिळावा. यासाठी आपण आपल्या अधिकाराने आमचा आवाज विधानसभेत मांडावा तसेच २०२३ खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस ४४८.९मि.मी पाऊस झाला सरासरी पेक्षा ७०% कमी झाला. उलट पक्षी अमळनेर तालुक्या पेक्षा जास्त पाऊस झालेला चाळीसगाव तालुका दुष्काळी तालुका जाहीर झाला. अमळनेर तालुक्यात कमी पाऊस झाला ,पावसाचा ४०दिवसाचा खंड होता तरीही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही. हा तालुक्यावर झालेला अन्याय आहे. तरी अमळनेर तालुका दुष्काळात घ्यावा व ही तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित ७५%पिक् विमा मिळावा. यासाठी आपण आमचा आवाज विधानसभेत न्यावा अशी विनंती शेतकऱ्यांची नाना पटोले यांना निवेदनाव्दारे केली आहे.