अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरात शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्यासंख्येने येतात. परंतू शाळा, महाविद्यालय व क्लासेस सुटल्यावर विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा घेत काही टवाळघोर, विकृत शाळाबाह्य तरूण विद्यार्थीनींची छेड काढत मुलींना त्रास होईल असे वर्तन करतात. त्यामुळे अनेक विद्यार्थींनी त्रस्त झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संबंधी सामाजिक प्रतिष्ठा जोपासून वादविवाद होण्याच्या भीतीने तक्रार करायला कोणीही पुढे येत नाही.
संस्थामालक व क्लासेसचालक मुलींच्या छेडीचे प्रकार बाहेर रस्त्यावर होत असल्यामुळे या प्रश्नांवर उपाययोजना करायला तयार होत नाही. त्यामुळे आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी अमळनेर शहरात जिल्हयाचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आले असता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थींनीनी पोलिस विभागाच्या माध्यमातून मुलींची छेड काढणाऱ्या टावळखोर मुलांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.बी. एस.पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, प्रा.अशोक पवार, अक्षय चव्हाण, आरती पाटील, धनश्री चव्हाण, वसुंधरा लांडगे, गिताली बेहरे, उर्वशी पाटील, आशुतोष पाटील, राहुल बिऱ्हाडे, बापूराव पाटील, दर्पण वाघ, शुभम पवार, देव गोसावी, यश हापसे, अजिंक्य चीखलोदकर, सोहम शिंदे, राहुल पाटील, उज्वल मोरे, निलेश पाटील, संदीप पाटील हे उपस्थित होते.