Home Cities यावल विशाळगड हिंसाप्रकरणातील दोषी दंगलखोरांवर कडक कार्यवाहीबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

विशाळगड हिंसाप्रकरणातील दोषी दंगलखोरांवर कडक कार्यवाहीबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील कौमी एकता फाऊंडेशन द्वारे फैजपूर प्रांत अधिकारी मार्फत राज्यपालांना विशाळगड हल्याचा निषेधार्थ व दोषी दंगलखोरांवर वर कठोर कार्यवाही संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. १४ जुलै २०२४ रोजी विशाल गडावर झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्यांक समाजाची मस्जिद, दर्गा व घरातील कुटूंबीयांचे नुकसान केले.

त्या सर्व लोकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करा व नुकसान झालेल्यांना शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई द्या व तोडफोड करणारे दंगल खोरांना शोधून काढा व कठोर कार्यवाही करा अशी एकमुखी मागणी येथील कौमी एकता फाऊंडेशन, फैजपूर यांच्या तर्फे करण्यात आली या वेळी संस्थेचे अध्यक्ष शेख कुरबान, सचिव सय्यद जावेद यांच्यासह संस्थेतील सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound