विशाळगड हिंसाप्रकरणातील दोषी दंगलखोरांवर कडक कार्यवाहीबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील कौमी एकता फाऊंडेशन द्वारे फैजपूर प्रांत अधिकारी मार्फत राज्यपालांना विशाळगड हल्याचा निषेधार्थ व दोषी दंगलखोरांवर वर कठोर कार्यवाही संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. १४ जुलै २०२४ रोजी विशाल गडावर झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्यांक समाजाची मस्जिद, दर्गा व घरातील कुटूंबीयांचे नुकसान केले.

त्या सर्व लोकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करा व नुकसान झालेल्यांना शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई द्या व तोडफोड करणारे दंगल खोरांना शोधून काढा व कठोर कार्यवाही करा अशी एकमुखी मागणी येथील कौमी एकता फाऊंडेशन, फैजपूर यांच्या तर्फे करण्यात आली या वेळी संस्थेचे अध्यक्ष शेख कुरबान, सचिव सय्यद जावेद यांच्यासह संस्थेतील सदस्य उपस्थित होते.

<p>Protected Content</p>