जुन्या भांडणावरून एकावर कोयत्याने वार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १० मार्च रोजी दुपारी २ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशीअंती अखेर बुधवार १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील वय ५२ रा. बोरखेडा ता.चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी १० मार्च रोजी दुपारी २ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्ञानेश्वर पाटील यांना गावात राहणारे नंदकिशोर साहेबराव पाटील, नानासाहेब वसंत पाटील, वसंत दगा पाटील, आणि नगराज मनोहर पाटील सर्व रा. बोरखेडा ता. चाळीसगाव यांनी कोयत्याने वार करून जखमी केली. तर जिवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जखमीला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर बुधवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदकिशोर साहेबराव पाटील, नानासाहेब वसंत पाटील, वसंत दगा पाटील, आणि नगराज मनोहर पाटील सर्व रा. बोरखेडा ता. चाळीसगाव यांच्या विरोधात मेहुणबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.

Protected Content