अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावती-नागपूर महामार्गावर तिवसा शहराजवळ एका नादुरूस्त ट्रेलरवर मागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. ही घटना १९ मे रोजी दुपारी १२ वाजता घडला. या अपघातात ट्रकमधील चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहे. आकाश सहारे व भानुदा वाघपांजर अशी जखमी चालक व वाहकाची नावे आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी माहितीनुसार वृत्त असे की, अमरावती-नागपूर महामार्गावरील तिवसा शहरापासून जवळ असलेल्या हॉटेल मधुबन नजीक मालवाहू ट्रेलर (एमएच ३१ सीएफ २९८२) नागपूरच्या दिशेने जात होता. त्याचे चाक पंक्चर झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम होते. त्याच वेळी मागून डाक व कुरियरचे साहित्य घेऊन आलेला भरधाव ट्रक (एमएच ३६ व्ही ३७२५) नादुरुस्त ट्रेलरवर जाऊन धडकला. त्यामुळे भीषण अपघात घडला असता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद तिवसा पोलिसांनी घेतली असून या संदर्भात अधिक तपास पोलिस करत आहे.