भरधाव आयशर टेम्पोने शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह चार जणांना चिरडले

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जालना जिल्ह्यातील मंठा येथे आज भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव आयशर टेम्पोने शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, ४ वर्षीय मुलीला व ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन चिरडले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चार वर्षांची मुलगी ही जखमी झाली आहे. ही घटना मंठा येथील देवी रोडवर घडली आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे. सीमा चव्हाण, मारिया पठाण, आणि रूपला राठोड अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर इशिका चव्हाण ही चार वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंठा शहरातील देवी रोडवर आज सकाळी एक महिला आपल्या मुलीला शाळेतून शाळेतून घरी जात होती. तर याच वेळी सहा वर्षीय मुलगीव एका ज्येष्ठ नागरिक देखील रस्त्याने जात होते. यावेळी एक भरधाव वेगातील आयशर टेम्पोने या चौघांना जोरदार धडक दिली. यातील तिघांच्या अंगवारून टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक फरार झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी होती. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी अपघात ग्रस्त टेम्पो ताब्यात घेतला असून चालकाचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

 

 

Protected Content